बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक रेमो डिसूजा यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातमीने सर्वांनाच चकित केले होते. देशभरातून नव्हे तर जगभरातील त्याचे चाहते त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. नुकतीच त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली आहे. तो सध्या रूग्णालयात असून त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती पुढे आली आहे. रेमोची पत्नी लीझेल डिसूझाने एक व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओमध्ये रेमो डिसूजा म्यूझिकवर पाय फिरताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना लीझेलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'पायांनी नाचणे एक गोष्ट आहे आणि मनापासून नाचणे ही वेगळी गोष्ट आहे. रेमो डिसूझा... तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वादासाठी सर्वांचे आभार..अभिनेता आमिर अलीने देखिल फोटो शेअर करत "मेरा भाई वापस आ गया है." असं कॅप्शन दिलं आहे.<br />#lokmatcnxfilmy #RemoDance #remodsouzaheartattack<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber